असदुद्दीन ओवैसी यांच्या देहली येथील घरावर अज्ञातांकडून दगडफेक

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या देहली येथील निवासस्थानावर अज्ञातांकडून मध्यरात्रीनंतर दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

ओवैसी यांनी सांगितले की, माझ्या देहली येथील घरावर पुन्हा एकदा आक्रमण  झाले आहे. वर्ष २०१४ नंतरची ही चौथी घटना आहे. मी जयपूरहून परत आलो आणि माझ्या घरातील नोकराने मला सांगितले की, जमावाने दगडफेक केली, ज्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या. ही घटना चिंताजनक आहे. सर्वाधिक सुरक्षा असलेल्या भागात ही घटना घडली आहे.