UP Minister On Cancer : गायीच्‍या गोठ्यात राहिल्‍यास कर्करोग बरा होऊ शकतो ! – संजय गंगवार

उत्तरप्रदेश सरकारचे राज्‍यमंत्री संजय गंगवार यांचा दावा

उत्तरप्रदेश सरकारचे राज्‍यमंत्री संजय गंगवार

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) –  प्रतिदिन सकाळी आणि संध्‍याकाळी गायीच्‍या पाठीवर हात फिरवल्‍याने रक्‍तदाब निम्‍म्‍याने न्‍यून होईल. गायीची १० दिवस सेवा केल्‍यास एखादे औषध २० मिलीग्रॅम घेत असल्‍याचे ते १० मिलीग्रॅमच घ्‍यावे लागेल. तुम्‍ही कर्करोगाचे रुग्‍ण असाल, तर गोठ्याची स्‍वच्‍छता प्रारंभ करा. तिथेच पडून राहिलात, तर कर्करोगही बरा होऊ शकतो. ही पूर्णपणे चाचणी केलेली गोष्‍ट आहे, जी मी तुम्‍हाला सांगत आहे, असा दावा उत्तरप्रदेश सरकारचे राज्‍यमंत्री संजय गंगवार यांनी केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत असल्‍याचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित होत आहे.

गंगवार लोकांना आवाहन करतांना पुढे म्‍हणाले की, गायीची सेवा ही सर्वांत मोठी सेवा आहे. लोकांनी गोठ्यातील गायींसाठी दान करावे. तुमच्‍या मुलांचा वाढदिवसही गोठ्यात साजरा करा. यातून चांगला संदेश जाणार आहे.