कोंढवा (पुणे) येथे ३ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्या एका धर्मांधावर गुन्हा नोंद !
कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार अक्षय कांचन आणि त्यांचे सहकारी गोरक्षक १० फेब्रुवारी या दिवशी गणेशखिंड रोड, पुणे येथे गेले असता त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने टेंपोमध्ये एकूण ३ बैल आढळले.