मुसलमानांच्या भावना दुखावतील म्हणून मलंगगडावर भगवा फडकवण्यासाठी जाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांकडून नोटीस !

ठाणे, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – नवनाथांपैकी एक असलेल्या मच्छिंद्रनाथांचे समाधी मंदिर आणि अन्य ५ नाथांच्या समाध्या असलेल्या ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर भगवा ध्वज फडकावण्यासाठी जाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना ‘मुसलमानांच्या भावना दुखावतील आणि त्यामुळे धार्मिक कलह होईल’, या भीतीने हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्.एस्. डेरे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली आहे. ‘गडावर भगवा ध्वज फडकावण्यासाठी अनुमती घ्यावी लागेल’, असे पोलिसांनी नोटिशीमध्ये म्हटले आहे.

१. या गडावर मुसलमानांनी अतिक्रमण केले असून समाधी मंदिरालाच ‘हाजी अब्दुर्रहमान मलंग शाहबाबा’ यांच्या दर्ग्याचे स्वरूप दिले आहे. वर्षभर तिथे मुसलमानांचा वावर असून वर्षातील १ दिवस हिंदूंना आरती करण्याची अनुमती असते.

२. वर्ष २००४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात श्री क्षेत्र मलंगगडाची भूमी वक्फ मंडळाची असल्याचे सरकारने घोषित केले. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्री. दिनेश देशमुख यांनी याविरोधात न्यायालयात याचिका केली आहे. हा गड मुसलमानबहुल झाल्याने येथे येणार्‍या हिंदूंवर सतत आरेरावी केली जाते.

३. मलंगगडावरील बालेकिल्ल्यावर ध्वज अडकवण्याचा मूळातच असलेला लोखंडी नळी गंजल्यामुळे झाल्यामुळे तो पालटून त्या जागी नवीन नळी लावण्यासाठी हे हिंदुत्वनिष्ठ जाणार होते. सर्वश्री सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अंबरनाथ तालुकाध्यक्ष सोमनाथ पांचाळ, सदस्य सर्वश्री राहुल पवार, भावेश शांदल, सचिन झाटे आणि दिनेश पादारे यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

४. या नोटिसीनुसार येथे भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण झाल्यास या हिंदुत्वनिष्ठांना उत्तरदायी धरण्यात येणार आहे. यासह सहकार्यांनी कोणते घटनाबाह्य कृत्य केल्यास त्यालाही या हिंदुत्वनिष्ठांना उत्तरदायी धरण्यात येणार आहे. या नोटिशीचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाईची चेतावणी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हाजी मलंग-श्रीमलंगगड हा वाद काय आहे?

श्री मलंगगड पर हिन्दुओं को आरती तथा पूजन करने के लिए धर्मांधोंद्वारा पुनः प्रतिबंध !

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक स्थळावर अतिक्रमण करणार्‍या मुसलमानांना नव्हे, तर भगवा फडकावण्यासाठी जाणार्‍या हिंदूंना नोटीस देणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठ राज्यशासनाच्या काळात असणेे अपेक्षित नाही !
  • छत्रपतींच्या राज्यात हिंदूंचे प्राचीन तीर्थस्थान असलेल्या गडावर भगवा फडकावण्यासाठी हिंदूंना अनुमती घेण्याची वेळ येणे, हे लज्जास्पद आहे !