कोंढवा (पुणे) येथे ३ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या एका धर्मांधावर गुन्हा नोंद !

गोरक्षक

पुणे – कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार अक्षय कांचन आणि त्यांचे सहकारी गोरक्षक १० फेब्रुवारी या दिवशी गणेशखिंड रोड, पुणे येथे गेले असता त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने टेंपोमध्ये एकूण ३ बैल आढळले. याविषयी चतुःश्रृंगी पोलिसांना कळवले असता पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करून वाहनांसह १ लाख १० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक परवेझ पठाण याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. कोंढवा येथील मलंग कुरेशी याच्याकडे बैलांची कत्तल करण्यासाठी बैल घेऊन जात असल्याचे परवेझ पठाण याने सांगितले. या प्रकरणी ऋषिकेश कामथे, राहुल कदम, अनिरुद्ध लष्करे, रोहन शिंदे, विशाल राऊत, कुणाल रेवडे यांनी विशेष परिश्रम घेतले. (गोरक्षकांनी गोमांस किंवा गोवंशीय यांची अवैध वाहतूक करणार्‍यांना पकडून दिल्यावर केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करण्यात येते; मात्र गोहत्येचे मूळ सूत्रधार मोकाट रहातात. गोवंशहत्या प्रतिबंध कायदा करून अनेक वर्षे झाली, तरी सरकार गोहत्या, गोतस्करी आणि अवैध पशूवधगृहांवर प्रतिबंध कधी लागणार आहे ? – संपादक)

संपादकीय भूमिका

नेहमी गोवंशियांची अवैध वाहतूक करणे किंवा हत्या करणे यांमध्ये धर्मांधच सापडतात, हे लक्षात घेऊन हिंदूंनी गोवंशियांचे रक्षण करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक !