नागोठणे (जिल्हा रायगड) येथे लव्ह जिहाद विरोधात पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नागोठणे (जिल्हा रायगड) – येथे घडलेल्या लव्ह जिहादच्या घटनेच्या विरोधात, तसेच एकंदरच सर्वत्र चालू असलेल्या लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या घटनांच्या निषेधार्थ येथील हिंदुत्वनिष्ठांनी २८ डिसेंबर या दिवशी नागोठणे बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला १०० टक्के प्रतिसाद देत येथील व्यापार्‍यांनी बाजारपेठ बंद ठेवून लव्ह जिहाद आणि धर्मांतर या हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवला. ‘संघे शक्ति कलौयुगे ।’ या वचनानुसार नागोठणेवासियांनी दाखवलेल्या या एकजुटीविषयी हिंदुत्वनिष्ठांनी त्यांचे आभार मानले आहेत.

संपादकीय भूमिका

नागोठणे येथील हिंदूंनी हीच एकजूट कायम ठेवून लव्ह जिहादविरोधी लढा उभारावा !