पुणे – महाराष्ट्रातील दोन शहरांची तुलना करता मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला; मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, अशी गंभीर चेतावणी राज ठाकरे यांनी दिली. पुणे येथे आयोजित केलेल्या ‘सहजीवन व्याख्यानमालेत’ ते बोलत होते. वर्ष १९९५ पूर्वी महाराष्ट्रात शांतता होती; मात्र आता पुण्याचा विस्तार झपाट्याने होतो आहे. पालट आवश्यक असला, तरी तो जिवावर उठणारा नको. वर्ष १९९५ नंतर उच्च मध्यमवर्गीयांची मुले परदेशात जायला लागली आणि तो वर्ग सर्व राजकारणापासून दूर गेला. ज्या वर्गाची राजकारणाला आवश्यकता होती, तो राजकारणाला तुच्छ मानायला लागला. त्यामुळे हा पालट आपल्या जिवावर उठला आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पालटावर भाष्य केले.