मंडौस चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या काही भागांत मुसळधार पाऊस: जनजीवन विस्कळीत

चेन्नई (तमिळनाडू) – मंडौस चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे चेन्नईच्या पट्टीपक्कम् आणि अरुंबक्कम् या भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वादळी वार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तमिळनाडूप्रमाणेच आंध्रप्रदेशातही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. या वादळामुळे आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.