गुजरातमध्ये ‘रामराज्या’प्रमाणे आदर्श निर्माण करण्यासाठी भाजप सरकारला शुभेच्छा ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – नुकत्याच झालेल्या गुजरात राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढवलेल्या या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांसारख्या निधर्मी पक्षांचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीतभाजपच्या झालेल्या विक्रमी विजयासाठी हिंदु जनजागृती समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा, तसेच भारतीय जनता पक्ष यांचे मन:पूर्वक अभिनंदन करते.

‘बहुसंख्य हिंदूंनी संघटितपणे दिलेल्या पाठिंब्यामुळे हे यशशिखर भाजपला गाठता आले, अशी आमची भावना आहे. मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमधील हिंदुत्व अधिक बळकट होत आहे. यामुळेच येणार्‍या काळात हिंदु समाजाच्या विविध समस्यांवर ठोस उपाय काढून हिंदूंना निश्‍चितच दिलासा मिळेल, याची आम्हाला निश्‍चिती आहे. ‘गुजरात ही देशातील हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे’, असे म्हटले जाते. आता यापुढे ‘रामराज्या’चे एक आदर्श उदाहरण म्हणूनही प्रचलित व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या शुभेच्छा’, असे समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. पूर्वी अत्यल्प लोकसंख्या असलेल्या मुसलमानांनी आज हिंदूंच्या ‘द्वारका’ बेटावर ‘लँड जिहाद’द्वारे बहुसंख्य भूमीवर नियंत्रण मिळवले आहे. तेथील अनधिकृत बांधकामे पाडली असली, तरी तेथील बहुसंख्य भूमी मुसलमानांकडे गेली आहे. बहुतांश व्यापारही हिंदूंकडून मुसलमानांकडे गेला आहे. द्वारका बेटावरील मुसलमान हे पाकिस्तानी मुसलमानांशी ‘रोटी-बेटी व्यवहार’ करत असल्यामुळे भविष्यात देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

२. गुजरातमध्ये हिंदूंच्या नवरात्रोत्सवावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे केली जात आहेत. हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. भरूचमध्ये तर हिंदूंची २८ घरे मुसलमानांनी विकत घेतल्याने ‘तेथील मंदिर विकायचे आहे’, असा फलक लावण्याची वेळ हिंदूंवर आली आहे. आदिवासी भागातील धर्मांतर होत आहे. या आणि अशा अनेक समस्या अजूनही हिंदु समाजाला भेडसावत आहेत.

३. या सर्व समस्यांवर तात्काळ भाजपचे सरकार अवश्य उपाययोजना काढून हिंदु समाजाला दिलासा देईल, तसेच गुजरात सरकारने केलेल्या ‘लव्ह जिहादविरोधी कायद्यातील ३, ४, ५ आणि ६ या कलमांवर न्यायालयाने जी स्थगिती आणली आहे, ती उठवण्यासाठी आणि हा कायदा आणखी कठोर करण्यासाठी सरकार कार्यवाही करेल, अशी अपेक्षा आहे.

४. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘समान नागरी कायदा’ करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह असून आम्ही अमित शहा यांचे अभिनंदन करतो.