पुण्यातील हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित !

तृप्ती कोलते

पुणे – हडपसर येथील भूमी प्रकरणात तृप्ती कोलते यांनी दिलेले चुकीचे आदेश, कोरोनाच्या काळात औषध खरेदीतील अनियमितता आणि निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी यांच्यामुळे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित करण्याचे आदेश राज्यशासनाने दिले. भूमी प्रकरणात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे.