श्री गणेशाची भक्ती करणारे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे !
अल्पावधीत माधवराव पेशवे यांना जिवापाड श्रम करावे लागले. त्यामुळे पूर्वीपासून नाजूक असलेल्या त्यांच्या प्रकृतीवर विलक्षण ताण पडला. हवापालटासाठी आणि गजाननावरील भक्तीमुळे ते थेऊरच्या मंदिराच्या आवारात येऊन राहिले. कार्तिक कृष्ण अष्टमीला ‘गजानन, गजानन’, असे म्हणत मोठ्या योग्याप्रमाणे नेत्रांद्वारे प्राण गेला.