राजस्थानमधील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करणारे हे मदरशांतून सिद्ध झालेले होते. इतकेच नव्हे, तर देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास `त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते. यातून ‘मदरशांतून आतंकवादी सिद्ध होतात का ?’, हा प्रश्न उरणार नाही, तसेच सर्वोच्च न्यायालयाने ‘मदरसे हे शिक्षणाचे वा प्राथमिक शिक्षणाचे केंद्र नसून ते धार्मिक प्रथा- परंपरा शिकवणारी केंद्रे आहेत’, असा स्पष्ट निर्णय दिलेला आहे. त्या आधारे केंद्र आणि राज्य सरकार यांनी मदरशांना शिक्षणाच्या नावाखाली अर्थसाहाय्य देणे बंद करावे.