अंधारात भ्रमणभाष हाताळल्यास दृष्टी दुर्बल होऊ शकते ! – डॉ. तात्याराव लहाने

अंधारात भ्रमणभाष वापरणार्‍यांनो, सावधान !

‘अपुर्‍या प्रकाशात भ्रमणभाषवर संभाषण केल्याने दृष्टी गमावण्याची शक्यता अधिक असते. पलंगावर पडल्या पडल्या अंधारात भ्रमणभाषवर ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘फेसबुक’ यांचे ‘अपडेट’ पहाणे हे दृष्टी दुर्बल होण्यास निमंत्रण ठरू शकते. अंधारात भ्रमणभाषवर बराच काळ व्यस्त राहिल्याने डोळ्यांची बाहुली आकुंचन पावते. ती आकुंचन पावलेली बाहुली अचानक उघडली जाते, तेव्हा ती सामान्य होईपर्यंत डोळ्यांसमोर अंधार येतो. काही वेळाने ती पूर्ववत् होते. त्यामुळे अंधारात भ्रमणभाष बघू नये’, असा समुपदेश जे.जे. रुग्णालयाचे नेत्रशल्यविशारद आणि अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला आहे.