पनवेल येथे मुसलमान मित्राकडून बारबालेला क्षुल्लक कारणावरून मारहाण !

२ वर्षांपासून ती रिक्शाचालक मित्र मुदतशीर बशीर राऊत याच्या समवेत करंजाडे येथे रहात आहे. बारबाला मुदतशीरला न सांगता बाहेर गेली होती. रात्री ती घरी परतल्यावर संतप्त झालेल्या मुदतशीरने तिला मारहाण करून शिवीगाळ केली.

दुर्गाडी (कल्याण) खाडीकिनारी वाळूमाफियांची सामग्री महसूल अधिकार्‍यांनी नष्ट केली !

अशा धडक कारवाईसह अधिकार्‍यांनी वाळूमाफियांना कठोर शासन होण्यासाठीही प्रयत्न करावेत !

पुणे येथील चांदणी चौकातील काम वेगाने पूर्ण करा ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामाच्या नियोजनाविषयी संबंधित अधिकार्‍यांसह त्यांनी सविस्तर चर्चा केली. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

जळगाव येथील श्रीराम रथोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला !

वर्ष १८७१ मध्ये संत आप्पा महाराज यांनी जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढील वर्षी म्हणजेच वर्ष १८७२ च्या कार्तिक शुक्ल एकादशीपासून जळगावनगरीत श्रीराम रथोत्सवाला प्रारंभ केला. यंदा या रथोत्सव परंपरेला १४९ वर्षे पूर्ण होत आहेत.

खलिस्तान्यांकडून धोका असलेले पंजाबमधील हिंदू !

अमृतसर (पंजाब) येथे पोलिसांचे संरक्षण असतांना शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्यांची खलिस्तानवाद्याकडून हत्या करण्यात आली. सूरी हे येथील गोपाल मंदिराबाहेर धरणे आंदोलन करत होते.

धर्मानुसार आचरण केल्याने आरोग्याचेही रक्षण होत असल्याने चंद्रग्रहणाच्या वेळी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार विनाअन्न उपवास करा !

उपवास करण्यासाठी मनाची सिद्धता होण्यासाठी हा लेख वारंवार वाचावा. तरीही मनाची सिद्धता न झाल्यास उपवास करू नये. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने कुणी कुणाला आग्रह करू नये. स्वतःचा निश्चय झालेला असेल, तर मात्र अवश्य २४ घंटे उपवास करून अनुभव घ्यावा.

शाकाहार आणि सात्त्विकता !

मांसाहाराची सवय आहे; पण तो सोडून शाकाहारी होण्याची प्रबळ इच्छा असल्यास त्यासाठी प्रयत्नपूर्वक, टप्प्याटप्प्याने शाकाहाराकडे वळले पाहिजे. यामुळे सात्त्विक विचार-आचार म्हणजे नेमके काय ? यांची अनुभूती घेता येईल. यात अशक्य असे काहीच नाही. केवळ मनाची सिद्धता महत्त्वाची आहे.

८.११.२०२२ या दिवशी भारतात दिसणारे खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित), ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे; म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल. त्यामुळे भारतात कुठेही ग्रहणस्पर्श दिसणार नाही. भारताच्या पूर्वेकडील काही प्रदेशात खग्रास अवस्था दिसू शकेल;

प्रा. साईबाबा यांच्यासंबंधी सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा आणि त्याचा कायदेशीर ऊहापोह !

मागील दोन भागात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे तत्कालीन न्यायमूर्ती ए.बी. चौधरी यांनी जामीन नाकारतांना स्वयंसेवी संस्था आणि वृत्तपत्रे यांना फटकारणे अन् त्यातून उलगडत गेलेले टप्पे आदी सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

पू. नंदा आचारी गुरुजी यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. नंदा आचारी गुरुजी यांचे संतपद घोषित केल्यावर त्यांच्या नयनांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा त्यांच्या चित्तातील भक्ती आणि आनंद भावाश्रूंच्या रूपाने व्यक्त झाल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळाचे वातावरण पुष्कळ भावमय आणि आनंददायी झाले.