दुर्गाडी (कल्याण) खाडीकिनारी वाळूमाफियांची सामग्री महसूल अधिकार्‍यांनी नष्ट केली !

प्रतिकात्मक छायाचित्र

कल्याण – येथील दुर्गाडी खाडीच्या किनारी बेसुमार वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांची वाळू उपशाची सर्व सामग्री महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी जाळून टाकली; मात्र अंधार असल्याने वाळूमाफियांनी तेथून पलायन केले. या वेळी अधिकार्‍यांनी बार्ज (बोटीचा एक प्रकार), तसेच सक्शन पंप उल्हास खाडीत बुडवले. अचानक झालेल्या या कारवाईने माफियांचे धाबे दणाणले. यापूर्वी दुर्गाडी खाडीच्या किनारी १ सहस्र ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला होता. ही सर्व वाळू जेसीबीच्या साहाय्याने पुन्हा खाडीत लोटून देण्यात आली.

संपादकीय भूमिका

अशा धडक कारवाईसह अधिकार्‍यांनी वाळूमाफियांना कठोर शासन होण्यासाठीही प्रयत्न करावेत !