गरब्यामध्ये ‘अली मौला’ गाणे गाण्याचा प्रयत्न करणार्या हिमेश रेशमिया यांना हिंदु संघटनांनी हाकलले !
‘हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी कोणते गाणे गायचे ?’, हेही ठाऊक नसणारे हिंदु गायक ! रेशमिया यांची ही कृती म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव आणि आत्मघाती धर्मनिरपेक्षता यांचेच दर्शक आहे !
‘ईडी’च्या १०० कोटी वसुलीच्या प्रकरणी अनिल देशमुख यांना जामीन
कायद्यानुसार आरोग्याच्या कारणास्तव हा जामीन मागण्यात आला, तसेच ‘आरोपी क्रमांक १’ हे अनिल देशमुख होते, असे कुठेही दिसून येत नाही, कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नाही, असेही देशमुख यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यात नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावे ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
फडणवीस म्हणाले की, राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. विचार मांडले जातात. हे विचार कायद्याच्या चौकटीत राहून मांडले जावेत. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे.
‘विजयी भव ।’
स्वतःच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी शारीरिक स्तरावर सक्षम होण्याचे, मानसिक स्तरावर संघर्ष पचवून उभारी घेण्याचे अन् आध्यात्मिक स्तरावर भगवंताच्या अनुसंधानाचे यत्न अविरत चालू ठेवण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर आरंभ करूया अन् हिंदूंची विजयगाथा पुन्हा एकदा काळाच्या पटलावर सुवर्णाक्षरात कोरण्यासाठी सिद्ध होऊया !
भारताने अमेरिकेला जाब विचारावा !
अमेरिकेच्या न्यूजर्सीच्या टीनेक डेमोक्रॅटिक म्युनिसिपल कमिटीने विश्व हिंदु परिषद, सेवा इंटरनॅशनल, हिंदु स्वयंसेवक संघ आदी ६० संघटनांवर आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप करणारा प्रस्ताव संमत केला आहे.
सनातन धर्माचा द्वेष करणार्यांनो, हे लक्षात घ्या !
रावण श्रीरामाला तुच्छ वनवासी समजत असे. शेवटी ‘रावणाचे काय झाले ?’, हे तुम्ही जाणता. विजयादशमीनिमित्त श्रीरामाचे हे शौर्य आठवून त्यांना शरण जा. त्यातच तुमचे कल्याण आहे.
हिंदूंनो, शस्त्रे आणि शमी यांच्या पूजनामागील धार्मिक पार्श्वभूमी जाणा !
१२ वर्षांचा वनवास संपल्यानंतर पांडवांना १ वर्ष अज्ञातवासात काढायचे होते. त्यांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली आणि वस्त्रे पालटून ते विराट राजाच्या दरबारी विविध रूपे घेऊन राहू लागले. अर्जुन ‘बृहन्नडा’ (नर्तकी) बनून नृत्यागारात राहू लागला. या कालावधीत अनेक संकटांचे त्यांनी कौशल्याने निवारण केले.
हिंदूंनो, विजयोपासनेद्वारे विजयोत्सवाकडे वाटचाल करूया !
विजयाचे केवळ स्मरण न करता या सर्वांनी विजय कसा संपादन केला, असुरांचे निर्दालन कसे केले, हे लक्षात घेऊन आपणही विजयोपासनेच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत !
‘रावणदहन करून त्याचा अवमान केला जातो’, असे सांगणार्यांनो, यामागील हिंदु धर्मशास्त्र लक्षात घ्या !
प्रभु श्रीरामाने अशा रावणाचा वध करून दृष्ट प्रवृत्तीचाच वध केला, याचे प्रतीक म्हणून रावणदहनाची परंपरा चालू आहे.