‘ईडी’च्या १०० कोटी वसुलीच्या प्रकरणी अनिल देशमुख यांना जामीन

अनिल देशमुख

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’) अटक केलेले माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना १०० कोटींची वसुली केल्याच्या प्रकरणी ११ मासांनंतर जामीन मिळाला आहे. सीबीआय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) अंतर्गतही त्यांना अटक करण्यात आली असल्यामुळे सध्या तरी ते कारागृहाबाहेर येऊ शकणार नाहीत. ते ७३ वर्षांचे असून त्यांना अन्य आजार आहेत. त्यामुळे कायद्यानुसार आरोग्याच्या कारणास्तव हा जामीन मागण्यात आला, तसेच ‘आरोपी क्रमांक १’ हे अनिल देशमुख होते, असे कुठेही दिसून येत नाही, कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नाही, असेही देशमुख यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले.