‘विजयी भव ।’

भारतात भयावह प्रमाणात कार्यरत असणार्‍या आतंकवादाचा बुरखा फाडून त्याला काही अंशी तरी नियंत्रित करण्याचे काम ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वरील बंदीने झाले आहे; तरीही देवीने रक्तबीज राक्षसाला मारल्यावर त्याच्या रक्ताच्या एका थेंबातून निर्माण होणार्‍या शेकडो राक्षसांप्रमाणे आतंकवादी प्रवृत्ती निर्माण होत असल्यामुळे अंतिमतः सैन्य पराक्रमाचा सीमेपलीकडील विजयोत्सवच भारतवासियांनी साजरा करणे अपेक्षित आहे. ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून नवनवीन शस्त्रास्त्रे, युद्धनौका आणि विमाने सैन्यात समाविष्ट होत आहेत, ही त्या विजयोत्सवाची पूर्वसिद्धता आहे’, असे राष्ट्रप्रेमी जनता गृहित धरत आहे. ‘३७० कलम’ काढून टाकल्यापासून काश्मीरमध्ये भारताचे झेंडे रस्त्यावर फडकू लागल्याचे ‘व्हिडिओ’ प्रसारित झाले खरे; पण आतंकवाद्यांनी हिंदूंच्या हत्यांचे जे सत्र तिथे चालूच ठेवले आहे, त्यातून आजही तिथे ‘हिंदूंचे पुनर्वसन’ हे दूरचे स्वप्नच राहिले आहे. नक्षलवाद काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचा दावा अधून-मधून केला जात आहे. साम्यवादी पक्षांची विविध राज्यांतील सरकारेच काय; पण ‘पुरोगाम्यांच्या मनामनांतील साम्यवाद जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत त्यांची बिजे संपली’, असे म्हणू शकत नाही; कारण भारतातून नष्ट झालेला खलिस्तानवाद विदेशात फळत-फुलत राहून आता थेट भारताच्या पंतप्रधानांनाच परत एकदा आव्हान द्यायला सिद्ध झाला आहे. आतंकवादी, साम्यवादी, ख्रिस्ती आणि त्याला आता खलिस्तान्यांची साथ हिंदूंवर प्रतिदिन आघात करून राष्ट्राला खिळखिळी करत आहे. धर्मांधांच्या नियोजनानुसार वर्ष २०४७ मध्ये ‘इस्लामी राष्ट्र’ भारतात येऊ द्यायचे नसेल, तर हिंदूंना त्यांचे स्वतःचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवण्यावाचून पर्याय नाही, हे त्यांनी आता तरी मनात नक्की केले पाहिजे !

हिंदूंनो, स्वबळासह संघटित व्हा !

स्वकोषात गुंतलेल्या हिंदु युवकांनी आता प्रतिदिन पहाटे उठून स्वतःच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी किमान शारीरिक प्रशिक्षण घेण्याची नितांत आवश्यकता आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’, अशी वेळ सध्या आली आहे. आज सतर्कता आणि संघटितपणा वाढवला नाही, तर कधी ‘सर तन से जुदा’ची वेळ आपल्यावर येईल, हे सांगू शकत नाही. आज भारतात सर्व प्रकारच्या ‘जिहादां’चे डोक्यावरून पाणी जात आहे. पाण्याखाली जात असलेल्या हिंदूंना त्यांचा श्वास रोखून, पाण्याच्या वर येऊन या आतंकी वादळावर मात करायची आहे. हिंदूंमध्ये ती क्षमता नक्कीच आहे; किंबहुना राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी त्याची वैचारिक सिद्धताही केली आहे. हिंदु देवता आणि धर्म यांवर होणारे विविध आघात अन् हिंदूंचा जिहादांच्या माध्यामातून चालू असलेला वंशविच्छेद यांविषयी सजग हिंदूंमध्ये जागृती करण्यात त्यांना काळानुसार यश मिळत आहे; परंतु मृतवत् जन्महिंदू अजूनही जागे झालेलेच नाहीत. त्यामुळे हिंदूंना त्यांची प्रचंड लोकसंख्या दिसत असली, तरी येत्या काळात त्याचे संघटित सुनियोजन करून त्यांची ‘संघशक्ती’ वाढवण्यावाचून पर्याय नाही; कारण कलियुगात तीच हिंदूंना तारून नेणार आहे. या संघशक्तीच्या बळावरच गल्लोगल्ली लपलेल्या आतंकी किडीची वळवळ कायमची बंद करणे त्यांना शक्य होणार आहे. हिंदु स्त्रीशक्तीने कुणावरही अवलंबून न रहाता प्रतिदिन स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे गिरवले, तर येणार्‍या काळात त्या स्वतःला सुरक्षित ठेवून समाजाचेही रक्षण करू शकणार आहेत. हिंदूंच्या समृद्ध राष्ट्राची स्थापना ही संघर्षाविना अशक्य आहे. गेली काही वर्षे हिंदुत्वनिष्ठ वैचारिक संघर्ष करत आहेत; परंतु स्वसंरक्षणासाठी आता त्यांना शारीरिक संघर्षाची सिद्धता करणे काळाने अपरिहार्य केले आहे. हिंदूंनो, काळ कठीण आहे; पण ‘भक्तासाठी देवच साक्षात् युद्ध करत असल्यामुळे विजय भक्ताचाच होतो’, हेच आपल्या प्राचीनतम परंपरेचे सार आहे. त्यामुळे अंतिम विजयप्राप्तीसाठी ‘अंतर्मनात भक्तीची ज्योत सतत तेवत ठेवायची आहे’, याचा क्षणभरही विसर पडू देऊ नका.

संपूर्ण जगभरात लोक ज्या गतीने आज हिंदुत्वाचे आचरण करू लागले आहेत, ते पहाता सनातन हिंदु संस्कृतीचे महत्त्व काळानुसार पुनःश्च दृगोच्चर होत आहे. विश्वगुरु होण्याची क्षमता असणार्‍या आमच्या भारतराष्ट्राची भगवी पताका संपूर्ण विश्वात खुलून दिसण्यासाठी आज तन, मन आणि धन यांचा त्याग करणार्‍या काही पिढ्यांची नितांत आवश्यकता आहे. दुर्दैवाने असंघटितपणा आणि शत्रूशी हातमिळवणी हा शाप हिंदु समाजाला आहे; पण जेव्हा तो विशिष्ट ध्येयाने संघटित होतो, तेव्हा त्याच्यात क्षात्रवृत्ती संचारते अन् त्याला दैवी साथ मिळाली, तर त्याचे क्षात्रतेजात रूपांतर होऊन त्याचा विजय निश्चित होतो.

शक्ती आणि भक्ती हेच विजयाचे स्रोत !

सध्याच्या भारतराष्ट्राच्या दयनीय स्थितीचे मूळ कारण भारतियांच्या व्यष्टी आणि समष्टी जीवनात प्रचंड प्रमाणात झालेले रज-तमाचे प्रदूषण हेच आहे. ‘राष्ट्रावरील विजयासाठी जे आत्मबळ लागते, ते इंद्रिय निग्रहानेच मिळणार आहे’, असे चाणक्य यांनी सांगून ठेवले आहे. ‘इंद्रियांवर नियंत्रण मिळवून आसक्तीरहित कर्म करणे, हाच खरा विजय आहे’, असा उपदेश भगवान श्रीकृष्ण गीतेच्या तिसर्‍या अध्यायात अर्जुनाला करतात. त्यामुळे साधनेतून होणारा आत्मसंयमनाचा संघर्ष केल्यावरच राष्ट्रजीवनातील विजयाचा मार्ग दिसू शकणार आहे. त्यामुळे आसुरी शक्तींचे निर्दालन करणार्‍या सर्व देवतांना त्यांची शस्त्रे आणि मंत्र यांतील शक्ती अन् ‘विजयी भव ।’ हा आशीर्वाद मागूया. सर्व क्षेत्रांत अराजकांचा कहर झालेल्या भारतमातेला त्यांतून मुक्त करून समृद्धीची विजयपताका फडकावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. स्वतःच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी शारीरिक स्तरावर सक्षम होण्याचे, मानसिक स्तरावर संघर्ष पचवून उभारी घेण्याचे अन् आध्यात्मिक स्तरावर भगवंताच्या अनुसंधानाचे यत्न अविरत चालू ठेवण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर आरंभ करूया अन् हिंदूंची विजयगाथा पुन्हा एकदा काळाच्या पटलावर सुवर्णाक्षरात कोरण्यासाठी सिद्ध होऊया !