रावण अतिशय विद्वान असूनही त्याचा वध का केला आणि त्याचा दहनाचा उत्सव का साजरा केला जातो, याचे कारण समजून घेतले पाहिजे. व्यक्ती उच्चविद्याविभूषित असो, सामर्थ्यवान असो, राजघराण्यातील असो; पण जर ती बलात्कारी, जनतेवर अन्याय करणारी, ऋषिमुनींची हत्या करणारी किंवा यज्ञयागांचा विध्वंस करणारी असेल, तर ती अधर्मीच असून दंडास पात्र आहे. प्रभु श्रीरामाने अशा रावणाचा वध करून दृष्ट प्रवृत्तीचाच वध केला, याचे प्रतीक म्हणून रावणदहनाची परंपरा चालू आहे.
(संदर्भ : sanatan.org)