सनातन धर्माचा द्वेष करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

प.पू. दास महाराज

हिंदुद्वेष्ट्यांनो, सनातन धर्माचा द्वेष करणे सोडून द्या. भगवंतासमोर पांडित्यपूर्ण भाषेत अहंकाराचे प्रदर्शन करू नका. भगवंताच्या अवताराला ओळखा.

प्रभु श्रीराम श्रीमन्नारायणाचे अवतार होते; पण अहंकाराने अंध झालेल्या रावणाला शेवटपर्यंत त्याची जाणीव झाली नाही. रावण श्रीरामाला तुच्छ वनवासी समजत असे. शेवटी ‘रावणाचे काय झाले ?’, हे तुम्ही जाणता. विजयादशमीनिमित्त श्रीरामाचे हे शौर्य आठवून त्यांना शरण जा. त्यातच तुमचे कल्याण आहे.

– प.पू. दास महाराज, सिंधुदुर्ग