‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे कोल्हापूर येथे निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करावे, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.

मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप !

शहरात १७ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता झालेल्या प्रचंड पावसाने कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, हडसपर या भागांतील नागरिकांची अक्षरशः झोप उडवली. पावसाचा जोर इतका भयंकर होता की, घरांमध्ये पाणी घुसले, रस्त्यांची स्थितीही भयानक झाली होती.

श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील श्रीराम पंचायतन मूर्तीच्या चोरीचे अन्वेषण करण्यासाठी प्रशासनाला ४० दिवसांची समयमर्यादा !

दीड मास उलटूनही चोरीचे अन्वेषण पूर्ण का होत नाही ? इतके दिवस पोलीस प्रशासन काय करत आहे ? हिंदुत्वनिष्ठांना अशा मागणीचे निवेदन द्यावे लागणे पोलिसांसाठी लज्जास्पद !

हिंदुद्वेषी खदखद !

कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे.

(अ)ज्ञानींचा विरोध !

देवतेचे नाव औषधाच्या चिठ्ठीवर लिहिले, तर चुकले कुठे ? आरोग्य रक्षणाची देवता म्हणून भारतात धन्वन्तरीची पूजा केली जाते. वैद्यकशास्त्रामध्ये कार्यरत असणारे मोठमोठे शस्त्रकर्म चिकित्सक किंवा तज्ञसुद्धा एखाद्या रुग्णाच्या कठीण स्थितीत स्वतःचे ज्ञान आणि अनुभव असूनही हतबल होतात…

नाशिक येथे नियमांचे उल्लंघन करणार्‍या ३१ खासगी बसचालकांवर कारवाई !

खासगी बसचालकांच्या मनमानीला चाप बसण्यासाठी पोलिसांनी नियमितपणे वाहनांची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

दौंड (जिल्हा पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई आणि अधीक्षक यांना लाच घेतांना अटक !

दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्यासह शिपाई खोत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : योगासने आणि मल्लखांब !

वर्ष १९२४ मध्ये लाहोर येथे ‘अखिल भारतीय ऑलिंपिक स्पर्धा’ या नावाने आणि त्यानंतर वर्ष १९४० पासून ‘राष्ट्रीय खेळ’ (नॅशनल गेम्स) या नावाने या स्पर्धांना प्रारंभ झाला. या वर्षी कर्णावती (गुजरात) येथे ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत पार पडली.

अमरावती येथे लाच घेतांना नायब तहसीलदाराला अटक !

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील अचलपूर येथील तहसील कार्यालयात स्वतःच्या कक्षामध्येच १८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना नायब तहसीलदार शंकर श्रीराव यांना १७ ऑक्टोबर या दिवशी रंगेहात पकडून अटक केली.

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सनातनच्या साधिकेचे सुयश !

महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा परिषद सातारा यांच्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कराड’ या योजनेअंतर्गत नुकतेच ‘स्तनपान : एक वरदान’ या विषयावर महिलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.