अमरावती येथे लाच घेतांना नायब तहसीलदाराला अटक !

अमरावती – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील अचलपूर येथील तहसील कार्यालयात स्वतःच्या कक्षामध्येच १८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना नायब तहसीलदार शंकर श्रीराव यांना १७ ऑक्टोबर या दिवशी रंगेहात पकडून अटक केली. काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार श्रीराव यांनी रेतीचा एक ट्रक पकडला होता. रेती तस्करीत पकडल्या गेलेल्या ट्रकच्या कागदपत्रांची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाला न पाठवण्याविषयी त्यांनी तक्रारदाराकडे २० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

संपादकीय भूमिका 

भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !