‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे कोल्हापूर येथे निवेदन

करवीर नायब तहसीलदार विपीन लोकरे (डावीकडे) यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

कोल्हापूर, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करावे, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन हलाल सक्तीविरोधी कृती समितीच्या वतीने करवीर विभागाचे नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना देण्यात आले. या प्रसंगी भुयेवाडी येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी सर्वश्री रवी खोचीकर, प्रकाश चौगले, आशिष पाटील, पवन कवठे, ग्रामपंचायत सदस्य श्री. अमर उरूंकर, श्री. प्रदीप शिंदे, श्री. शिवप्रसाद उरूंकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशांक सोनवणे उपस्थित होते.