कराड, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा परिषद सातारा यांच्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कराड’ या योजनेअंतर्गत नुकतेच ‘स्तनपान : एक वरदान’ या विषयावर महिलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सनातनच्या साधिका सौ. चैत्राली शुभम् वडणगेकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रोहिणी ढवळे मान्यवर म्हणून उपस्थित होत्या. या वेळी सौ. चैत्राली शुभम वडणगेकर म्हणाल्या, ‘‘निबंध स्पर्धेच्या पूर्वसिद्धतेसाठी मी सनातन संस्थेचा ‘आईचे दूध : भूलोकातील अमृत’ या ग्रंथाचा अभ्यास केला. या ग्रंथामधून अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.’’