देवतांचे विडंबन करून कोट्यवधी रुपये उकळू पहाणार्‍या चित्रपटांवर आजीवन बंदी आणा ! – राम कदम, आमदार, भाजप

हे हिंदु धर्माला नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र आहे. सध्याचे चित्रपट निर्माते सनातन धर्माच्या कल्याणार्थ नव्हे, तर स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवत आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार !

अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेत आहोत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अभिनेत्री मनवा नाईक यांच्याशी अयोग्य वर्तन करणार्‍या उबेरच्या मुसलमान कॅबचालकाला अटक !

दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री मनवा नाईक यांच्यासमवेत अयोग्य वर्तन करणारा ‘उबेर’ कॅबचालक महंमद मुराद आझम अली (वय २४ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली.

वर्धा येथे वक्फ कायदा आणि हलाल प्रमाणपत्र यांच्या विरोधात ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना सोपवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास २ पानांतून कळणार नाही ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री

पुणे महापालिकेचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण समारंभ

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत भाजप आघाडीवर !

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल घोषित होण्याची प्रक्रिया १७ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भाजप ३९७ जागांवर निवडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

किरकटवाडी-खडकवासला (पुणे) येथे स्थानिकांचे रास्ता रोको आंदोलन !

रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, यासाठी रास्ता रोको आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का देत नाही ? असे प्रशासन काय कामाचे ? असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

‘ईडी’द्वारे अजित पवार यांच्यासह ७२ संचालकांची पुन्हा चौकशी होणार !

२५ सहस्र कोटी रुपयांचे राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण

ब्रिटनमधील संघटित हिंदु संघटना !

‘भारतातील हिंदूं संघटना संघटितपणे हिंदूंसाठी काही करत आहेत’, असे चित्र फारच दुर्मिळ आहे. त्या तुलनेत ‘ब्रिटनमधील हिंदूंच्या संघटना एवढ्या मोठ्या संख्येने आहेत आणि त्या त्यांच्यावरील आक्रमणासाठी संघटित होऊन सरकारकडे आवाज उठवत आहेत, हे भारतातील हिंदूंसाठी आणि त्यांच्या संघटनांसाठी आदर्श आहे !

पट्टणकोडोली (जिल्हा कोल्हापूर) येथील यात्रेत पाळणा कोसळून ५ घायाळ !

१६ ऑक्टोबर या दिवशी रात्री १० वाजता ‘ड्रॅगन रेल्वे’चा पाळण्याचा (मोठा पाळणा) मागील डबा तुटून १० फुटांवरून भूमीवर कोसळला.