किरकटवाडी-खडकवासला (पुणे) येथे स्थानिकांचे रास्ता रोको आंदोलन !

रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांचा संताप

पुणे – येथील किरकटवाडी-खडकवासला शिव रस्त्याची गेल्या काही दिवसांत प्रचंड दुरवस्था झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने हा रस्ता पुन्हा खरवडून निघाल्याने तिथे वाहतूककोंडी होत आहे; पण प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याने स्थानिक रहिवाशांनी १६ ऑक्टोबर या दिवशी जवळ जवळ अडीच घंटे तेथे रस्ता बंद आंदोलन केले. त्यामुळे वाहतुकीचा आणखीनच खोळंबा झाला. (रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, यासाठी रास्ता रोको आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का देत नाही ? असे प्रशासन काय कामाचे ? असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)