काशीतील रजिया मशीद पूर्वीचे काशी विश्‍वानाथ मंदिर असल्याने तेथे पुन्हा मंदिर बांधा !

काशी राजपरिवारातील मुलीकडून याचिका !

भारताची शोकांतिका !

‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हणजुणे येथील वादग्रस्त ठरलेले कर्लिस उपाहारगृह पाडण्यास राष्ट्रीय हरित लवादाकडून मान्यता

वर्ष २००५ मध्ये केलेल्या तक्रारीवर वर्ष २०१६ मध्ये निर्णय !,आणि वर्ष २०२२ मध्ये राष्ट्रीय हरित लवाद त्याला मान्यता देत आहे. या कूर्मगतीने चालणार्‍या प्रशासकीय कारभारातून कधी गैरकारभार किंवा अतिक्रमणे बंद होतील का ?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाच १९४७च्या फाळणीचा इतिहास प्रत्येक भारतियाने जाणून घ्यावा ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे

फाळणी का झाली ? हे समजून घेतले पाहिजे. इतिहास विसरणार्‍यांना तो इतिहास पुन्हा भोगावा लागतो, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले.

महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संघटित व्हायला हवे ! – मनोज सूर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष, भाजप

महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपण संघटित व्हायला हवे. ‘जे धर्माचे कार्य करतील त्यांनाच मतदान करू’, अशी भूमिका हिंदूंची असायला हवी, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज सूर्यवंशी यांनी केले.

पुणे येथील गणेशोत्सव मंडळात प्रवचन !

गणपति आणि गणेशोत्सवाच्या संदर्भात आम्हाला पुष्कळ चांगली माहिती समजली. आम्हाला धर्म आणि आध्यात्मिक माहिती मिळावी यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनांचे आयोजन करा, असे सर्वांनी सांगितले.

साधना केल्यास प्रत्येक हिंदूचे कुटुंब आनंदी होईल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित महिलांनी सत्संग चालू करण्याची मागणी केली, तसेच ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध विधी कसे करावेत ?’ याविषयी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यास सांगितले.

आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर.

अनंतचतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी मध्य रेल्वेकडून १० विशेष लोकलगाड्या

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, तसेच विसर्जन पहाण्यासाठी मुंबई आणि उपनगर या ठिकाणांहून भाविक गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि लालबाग येथे येतात. त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताफ्यात संशयास्पदरित्या फिरणार्‍या तोतया अधिकार्‍याला अटक !

अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षण व्यवस्थेत तोतया अधिकारी घुसतोच कसा ?  असे होऊ देणारे पोलीस आणि गुप्तचर विभाग देशात लपून बसणार्‍या आतंकवाद्यांना शोधून त्यांचा समूळ नायनाट कसा करतील ?