अनंतचतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी मध्य रेल्वेकडून १० विशेष लोकलगाड्या

मुंबई – अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध चौपाट्यांवर होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कल्याण आणि पनवेल स्थानकांदरम्यान अतिरिक्त १० उपनगरीय विशेष गाड्या चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, तसेच विसर्जन पहाण्यासाठी मुंबई आणि उपनगर या ठिकाणांहून भाविक गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि लालबाग येथे येतात. त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली आहे.