नाशिक येथे श्री गणेशमूर्तींची मिरवणूक जात असतांना अजान चालू झाल्यावर मिरवणूक थांबवली !

हिंदु सहिष्णु असल्याने अन्य धर्मियांच्या धार्मिक कृतीच्या वेळी त्यांचा सन्मान करतात; मात्र कधी मंदिरात आरती चालू झाल्यावर ती संपेपर्यंत मशिदीतून अजान देण्याचे कधी थांबवले जाते का ?

महाराष्ट्रात अतीवृष्टीचा २९ जिल्हे आणि ३६८ गावे यांना फटका !

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतीवृष्टीचा २९ जिल्हे आणि ३६८ गावे यांना फटका बसला असून नागरिकांसाठी ११७ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. २० सहस्र ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे.

अनंतचतुर्दशीला मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

संपूर्ण महाराष्ट्रात अनंतचतुर्दशीच्या दिवशी १० दिवसाच्या ‘श्रीं’च्या मूर्तींचे भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात विसर्जन केले. २ वर्षांनंतर कोरोना महामारीच्या वेळची बंधने दूर झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा पूर्वीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात सर्वत्र भाविकांची गर्दी झाली.

सुवर्ण मंदिराजवळ तंबाखू आणि मद्य यांचे सेवन करणार्‍याची निहंग शिखांकडून हत्या

प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून १ किमी अंतरावर निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली. या व्यक्तीने तंबाखू आणि मद्य यांचे सेवन केल्यामुळे ही हत्या करण्यात आली. हरमनजीत सिंह असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे.

हिंदूंच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक : ६ पोलिसांसह अनेक जण घायाळ

हिंदूंच्या मिरवणुकांवर मशिदीवरून होणारी दगडफेक कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

प्रिन्स चार्ल्स बनले ब्रिटनचे नवे राजे !

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (वय ९६ वर्ष) यांचे ८ सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा स्कॉटलंड येथे निधन झाले. महाराणी एलिझाबेथ यांचे पार्थिव स्कॉटलँडहून शाही रेल्वेने बकिंघम पॅलेस या ठिकाणी आणले जाणार आहे.

इस्लाममध्ये नमाज अनिवार्य नाही, तर हिजाब कसे काय आवश्यक ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब  घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने सरकारचा निर्णय कायम ठेवला होता.

२ वर्षांनंतर लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्स भागातून चीन आणि भारत यांचे सैन्य जात आहे माघारी !

चीन भारताच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असला, तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नसल्याने भारताने सतर्क रहाण्याचीच आवश्यकता आहे !

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांना धमकी

अमेरिकेत भारतियांविषयीच्या द्वेषात वाढ !

बरेली (उत्तरप्रदेश) मशीद बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या महंमद समद याला अटक

हिंदू कधी अशी धमकी देणार नाहीत आणि असे कृत्य करणार नाहीत, हे सत्य आतातरी हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ ठरवणारे लक्षात घेतील का ?