महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संघटित व्हायला हवे ! – मनोज सूर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष, भाजप

लातूर येथे श्री तानाजी गणेश मंडळाच्या वतीने गणेशभक्तांसाठी ‘शौर्यजागृती’ व्याख्यानाचे आयोजन

‘शौर्यजागृती’ व्याख्यानासाठी उपस्थित गणेशभक्त

लातूर ८ सप्टेंबर (वार्ता.) – आपल्याला स्वतःची ओळख एक हिंदू म्हणून अभिमानाने सांगता यायला हवी. हिंदु धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पुष्कळ वेदना सहन केल्या; मात्र धर्म सोडला नाही, तसेच धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. अशा महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपण संघटित व्हायला हवे. ‘जे धर्माचे कार्य करतील त्यांनाच मतदान करू’, अशी भूमिका हिंदूंची असायला हवी, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज सूर्यवंशी यांनी केले.

१. येथील रत्नाई मंगल कार्यालयात श्री तानाजी गणेश मंडळाच्या वतीने शहरातील विविध गणेशोत्सव मंडळातील गणेशभक्तांसाठी ‘शौर्यजागृती’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर उपस्थित होते. या व्याख्यानाचा येथील श्री साईबाबा गणेश मंडळ, श्री सत्य गणेश मंडळ, श्री शिव शंभुराजे गणेश मंडळ, श्री मोरया गणेश मंडळ आदी मंडळांच्या सदस्यांनी लाभ घेतला.

२. या वेळी श्री. हर्षद खानविलकर म्हणाले, ‘‘हिंदु धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. त्यामुळे धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे धर्मरक्षणाचे कार्य करणे आवश्यक आहे.’’

मंडळामध्ये लावण्यात आलेले फलक प्रदर्शन

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी स्वरक्षणाची (दंडसाखळीची) प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.

२. समितीच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी क्रांतीकारकांची माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.

३. या वेळी उपस्थितांनी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

४. कार्यक्रमाचे नियोजन आणि पूर्वसिद्धता श्री तानाजी गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिवक्ता शहाजी सूर्यवंशी, सर्वश्री रितेश चव्हाण, ओम गाढवे, मंदार आराध्ये, संदेश कुंभार, पारस निकम, अभिषेक चव्हाण, शरद माने, सिद्धार्थ पवार, दीनानाथ पवार, प्रतीक शिंदे, अजिंक्य शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, राष्ट्रपुरुष, मंदिरे आदींच्या रक्षणार्थ हिंदूंनी संघटित होणे, हे त्यांचे धर्मकर्तव्यच !