केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताफ्यात संशयास्पदरित्या फिरणार्‍या तोतया अधिकार्‍याला अटक !

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबर या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कुटुंबासह आले होते. त्यामुळे मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहा यांच्या ताफ्यात कोट आणि टाय घालून संशयास्पदरित्या फिरणार्‍या एका तोतया अधिकार्‍याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली. हेमंत पवार असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा धुळे जिल्ह्यातील आहे. पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी पवार याची चौकशी केली. तेव्हा त्याने सरकारी ओळखपत्र दाखवून स्वतः केंद्रीय गृहमंत्रालयातील अधिकारी असल्याचे सांगितले. अधिक चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपादकीय भूमिका

अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षण व्यवस्थेत तोतया अधिकारी घुसतोच कसा ?  असे होऊ देणारे पोलीस आणि गुप्तचर विभाग देशात लपून बसणार्‍या आतंकवाद्यांना शोधून त्यांचा समूळ नायनाट कसा करतील ?