काशीतील रजिया मशीद पूर्वीचे काशी विश्‍वानाथ मंदिर असल्याने तेथे पुन्हा मंदिर बांधा !

काशी राजपरिवारातील मुलीकडून याचिका !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशी राजपरिवारातील एका मुलीने धार्मिक स्थळ कायदा १९९१ (प्लेसेस ऑफ वर्शिप) या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करणारी याचिका प्रविष्ट केली आहे. या अंतर्गत तिने काशी येथील रजिया मशीद पूर्वीचे काशी विश्‍वानाथ मंदिर असल्याची सांगत आता मशिदीमध्ये पालट करून तेथे पुन्हा मंदिर बांधण्याची मागणी केली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, वर्ष ११९४ मध्ये कुतुब-उद-दीन-ऐबक याने मूळ काशी विश्‍वनाथ मंदिर तोडून तेथे रजिया मशीद बांधली होती. आजही ती सध्याच्या काशी विश्‍वनाथ मंदिराच्या समोर अस्तित्वात आहे. याव्यतिरक्त औरंगजेब याने पंचगंगा घाटावरील बिंदु माधव मंदिर पाडून तेथे धरहरा मशीद बांधण्यात आली. तेथेही पुन्हा मंदिर बांधण्यात यावे, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.