आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर

सांगोला येथील नायब तहसीलदार किशोर बडवे यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

सांगोला (जिल्हा सोलापूर), ८ सप्टेंबर (वार्ता.) – गोशामहल (तेलंगाणा) येथील आमदार टी. राजासिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवावी, तसेच त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन राज्यपाल, राजभवन, तेलंगाणा यांच्या नावे सांगोला येथील नायब तहसीलदार किशोर बडवे यांना देण्यात आले.

लातूर येथील उपजिल्हाधिकारी श्री. ढगे यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्वश्री संतोष पाटणे, अक्षय क्षीरसागर, लक्ष्मीकांत पाचंगे, सागर माळी, डॉ. मानस कमलापूरकर, प्रवीण जानकर, पत्रकार नागेश जोशी, नवनाथ कावळे, अनिल वाघमोडे, अतुल चव्हाण, अजय गायकवाड, गणेश सुरवसे, आकाश गायकवाड, भीमाराम चौधरी, प्रशांत सावंत, महेश चौधरी आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

फलटण येथील तहसीलदार समीर यादव यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

याच मागणीचे निवेदन अंबाजोगाई (जिल्हा बीड), फलटण (जिल्हा सातारा), लातूर, तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील धर्मप्रेमी यांनी, तर परळी वैद्यनाथ येथे श्री. मधुसूदन लड्डा, श्री. आणि सौ. जैस्वाल यांनी प्रशासनाला दिले.