हिंदु जनजागृती समितीची गणेशोत्सव मोहीम
पुणे, ८ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत नुकतेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नेताजी गणेशोत्सव मित्र मंडळा’च्या वतीने ‘श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन झाले. या वेळी ८० हून अधिक महिला, पुरुष तसेच तरुण यांनी या प्रवचनाचा लाभ घेतला, तसेच गणपति अथर्वशीर्षाची सामूहिक २१ आवर्तने घेण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धर्मशिक्षण असलेले २ फलक छापून घेऊन मंदिरात लावले.
विशेष
१. गणपति आणि गणेशोत्सवाच्या संदर्भात आम्हाला पुष्कळ चांगली माहिती समजली. आम्हाला धर्म आणि आध्यात्मिक माहिती मिळावी यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनांचे आयोजन करा, असे सर्वांनी सांगितले.
२. गणपति मंदिरात धर्मशिक्षणवर्ग चालू करावा, जेणेकरून आम्हाला धर्माचरणाची माहिती मिळेल, असे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.