मेळघाटातील (जिल्हा अमरावती) पाचडोंगरीत दूषित पाण्यामुळे दोघांचा मृत्यू; ७४ जणांवर उपचार चालू !


 अमरावती – चिखलदरा तालुक्यातील पाच डोंगरी येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या आजारामुळे एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे. गंगाराम धिकार आणि सविता अखंडे अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अनुमाने ७४ जणांवर चुर्णी, काट कुंभ आणि पाचडोंगरी गावातच उभारलेल्या शिबिरात उपचार चालू आहेत. गावकर्‍यांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी; म्हणून गावातील शाळेतच तात्पुरत्या स्वरूपात काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे शिबिराची (कँप) उभारणी करण्यात आली आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर गावातच उपचार चालू आहेत.