अजमेर (राजस्थान) – उदयपूर येथे २८ जून या दिवशी कन्हैयालाल यांची हत्या केल्यानंतर मारेकरी रियाज अत्तारी आणि महंमद गौस हे पळून अजमेर येथे दर्ग्याचा सेवेकरी गौहर चिश्ती याच्याकडे जाणार होते, असे समोर आले आहे. पळून जातांना मारेकर्यांना पोलिसांनी वाटेतच पकडले होते. १७ जून या दिवशी गौहर चिश्ती उदपूर येथे गेला होता. त्याने तेथे नूपुर शर्मा यांच्या विरोधात शिरच्छेद करण्याची घोषणाबाजीही केली होती. यामुळे त्याच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. तेव्हापासून तो पसार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी रियाज याने पैंगबर यांचा अवमान करणार्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणारा व्हिडिओ बनवून प्रसारित केला होता. गौहर यानेच रियाज आणि गौस यांना कन्हैयालाल यांची हत्या करतांनाचा व्हिडिओ बनवण्यास सांगितले होते.
गौहर चिश्ती हा जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा सक्रीय सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.
#Sources: On June 17, #GauharChishti came to Udaipur to meet Mohammad Riyaz Attari (#KanhaiyaLal‘s killer) after raised provocative slogans of ‘Sar Tan se Juda’ at #Ajmer Sharif’s gate. On this same day Riyaz made the first ‘Beheading’ threatening video. (1/2)
— Nikhil Choudhary (@NikhilCh_) July 7, 2022
संपादकीय भूमिकाअजमेर दर्ग्याच्या एका सेवेकर्याला नूपुर शर्मा यांच्या हत्येची धमकी दिल्यावरून यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या दर्ग्याचे संचलन करणार्या अंजुमन कमेटीच्या सचिवानेही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. गौहर चिश्तीही कन्हैयालाल यांच्या हत्येत सहभागी आहे, असे उघड होत आहे. यातून स्पष्ट होते की, अजमेर दर्ग्याचा हिंदूंच्या विरोधात जिहाद करण्यात सहभाग आहे. यामुळे या दर्ग्याशी संबंधित सर्वांची चौकशी करून हा दर्गा आता सरकारने कह्यात घेऊन येथे सरकारी अधिकारी नियुक्त करण्याचे धाडस दाखवावे ! |