इंदूर (मध्यप्रदेश) येथील आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव साजरा

प.पू. भक्तराज महाराज

इंदूर (मध्यप्रदेश) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी असलेला जन्मोत्सव येथील ‘भक्तवात्सल्याश्रमा’त भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला. सकाळी प.पू. बाबांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर स्तवनमंजिरी म्हणण्यात येऊन नंतर आरती करण्यात आली. दुपारी भंडारा झाला, तर रात्री भजने म्हणण्यात आली.