विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी यांचे नाव निश्चित !

गेल्या काही दिवसांपासून रिक्त असणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.

आरेमध्ये होणाऱ्या मेट्रोच्या कारशेडविरोधात आज पर्यावरणवाद्यांचे आंदोलन !

राज्य सरकारने मेट्रोची कारशेड पुन्हा आरेमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी ३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता आरे परिसरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड परिसरात पुष्कळ प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आजपासून विधानसभेचे अधिवेशन, तर ४ जुलैला सरकारची बहुमताची परीक्षा !

राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ४ जुलै या दिवशी बहुमत सिद्ध करायचे आहे. तत्पूर्वी ३ जुलै या दिवशी राज्य विधानसभेचे २ दिवसांचे ‘विशेष अधिवेशन’ चालू होणार आहे.

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांच्या वतीने चोपडा येथे प्रशासनास निवेदन !

राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची धार्मिक द्वेषातून अमानुष हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन चोपडा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांच्या वतीने प्रशासनास देण्यात आले. निवेदन नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी स्वीकारले.

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने ३०० गाड्यांचे नियोजन !

६ ते १४ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रा होत असून १० जुलै हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावांतील भाविक पंढरपूर येथे प्रवास करतात.

हिंदूंना रक्षणकर्ता हवा !

‘हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व कुणाकडे आहे ?’ हे दायित्व केंद्रातील सरकार उचलणार का ? उचलणार असेल, तर कधी उचलणार ? हिंदूंचे रक्षण करण्यापासून त्यांना कुणी अडवले आहे ? ‘आम्हाला कुणीच वाली नाही. आमचे रक्षण आम्हीच करायला हवे’, असे हिंदूंना वाटून त्यांनी कायदा हातात घेतला, तर त्याला उत्तरदायी कोण ?

निधन वार्ता

साधिका सौ. सुमेधा सुधीर जोशी यांच्या आई आणि सनातन संस्थेच्या हितचिंतक अन् अर्पणदात्या श्रीमती शैलजा देऊस्कर यांचे २९ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

अमरावती येथे उच्च शिक्षण सहसंचालकास लाच स्वीकारतांना अटक !

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट झाली होती. या प्रकरणातील उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने कार्यकर्त्याची आत्मदहनाची चेतावणी !

वाळू ठेक्याची समयमर्यादा ९ जून या दिवशी संपूनही मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथे वाळूचा उपसा चालू आहे. आजही त्या ठिकाणी पाण्यातून बोट आणि जेसीबी यांच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याने नदीमध्ये २० ते २५ फूट खड्डे पडले आहेत.

पुणे येथे २ लाखांची लाच घेतांना महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक कह्यात !

पोलिसांची वाढती लाचखोरी चिंताजनक आहे. असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ? लाचखोरीवर जरब बसण्यासाठी एक सक्षम यंत्रणा प्रत्येक कार्यालयात उभारण्यासाठी आता सर्वसमावेशक प्रयत्न होणे आवश्यक !