हिंदूंना रक्षणकर्ता हवा !

नेदरलँडचे खासदार गीर्ट विल्डर्स

कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर नेदरलँडचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीट करून ‘हिंदूंना अशा नेत्याची आवश्यकता आहे, जो हिंदूंचे १०० टक्के रक्षण करील’, असे मत मांडले आहे. ‘नेदरलँड्ससारख्या दूरदेशी बसून एका राजकारण्याने मांडलेले राजकीय विचार’, असे समजून या मताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; कारण विल्डर्स हे केवळ नेदरलँड्समध्येच नव्हे, जर जगात इस्लामचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. नेदरलँड्स हा युरोपातील सुधारणावादी आणि मानवाधिकाराची मूल्ये जपणारा देश ! या देशात कडवेपणा किंवा कट्टरतावाद यांना थारा नाही; मात्र याच देशात विल्डर्स यांना डोक्यावर घेतले गेले. एवढे की, त्यांना ‘नेदरलँड्सचे डोनाल्ड ट्रम्प’ म्हणून ओळखले जाते. सिरियामध्ये इस्लामिक स्टेटचा उदय झाल्यानंतर मुसलमानांच्या झुंडीच्या झुंडी युरोपात पोचल्या. मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांच्यासाठी युरोपीय देशांनी द्वारे खुली केली आणि त्याचा फटका या देशांना बसला. नेदरलँड्सही त्यांतील एक ! याविषयी विल्डर्स यांनी आवाज उठवला. त्यांनी या कट्टरतावादी मुसलमानांना त्यांच्या देशात आश्रय देण्याच्या सूत्राला कडाडून विरोध केला. यासाठी त्यांनी ‘फ्रीडम पार्टी’ नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला. त्यांनी विविध व्यासपिठांवरून इस्लाम आणि कुराण यांविषयी परखडपणे अन् वस्तूनिष्ठपणे बोलण्यास प्रारंभ केला. त्यांची एवढी ओळख सांगण्याचे कारण म्हणजे ‘इस्लाम किंवा मुसलमानांचा कट्टरतावाद’ यांविषयी कुणीही काही बोलले, तर त्याला ‘माथेफिरू’ संबोधून त्याकडे दुर्लक्ष करण्याची वाईट सवय भारतातील काही ‘सेक्युलर’वाद्यांना लागली आहे. विल्डर्स यांच्या संदर्भात भारतातील हिंदूंनी आणि हिंदु लोकप्रतिनिधींनी ही चूक करू नये. विल्डर्स यांच्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. त्यांना शिरच्छेद करण्याच्या वारंवार धमक्या दिल्या जातात; मात्र तरीही धमक्यांना न घाबरता ते कट्टरतावादी मुसलमानांविषयी परखडपणे बोलतात. त्यांनी नूपुर शर्मा यांनाही पाठिंबा दिला होता. त्या वेळी ‘नेदरलँड्समधील भारतीय राजदूतांना भेटण्याची वेळ मागूनही ते भेट देण्यास टाळत आहेत’, असा आरोप त्यांनी केला होता. याविषयी भारत सरकारने कोणतेही स्पष्टीकरण दिल्याचे ऐकिवात नाही. इस्लामी कट्टरतावादाची झळ बसलेल्या आणि त्याची झळ बसत असलेल्या भारतातील हिंदूंच्या रक्षणासाठी आपुलकीने बोलणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण्याच्या मतांकडे हिंदूंनी गांभीर्याने बघायला हवे. एका युरोपीय देशातील राजकारण्याला भारतातील हिंदूंविषयी वाटते, ते भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधींना वाटते ? विल्डर्स यांच्यासारख्या नेत्यांच्या अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेतले जात नाही आणि हिंदूंचे रक्षणही केले जात नाही, हे कळीचे सूत्र आहे.

हिंदूंना वाऱ्यावर सोडणार का ?

‘आम्ही हिंदूंची हत्या करणार’, ‘आम्ही हिंदु मुलींवर बलात्कार करणार’, ‘आम्ही भारताचे इस्लामीस्थान करणार’, या हिरव्या विचारसरणीच्या धुंदीत वावरून भारतातील कट्टरतावादी मुसलमान हे हिंदूंचा रक्तपात घडवून आणत आहेत. कमलेश तिवारी यांचे काय झाले ? त्यांचा शिरच्छेद केल्यानंतर काही काळ देशात संतापाची लाट निर्माण झाली. त्यानंतरही हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या; मात्र या हत्यांकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळेच इस्लामिक स्टेटचे आतंकवादी ज्याप्रमाणे शिरच्छेद करण्याचे व्डिहिओ बनवायचे, त्याप्रमाणे कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करतांना त्याचा व्हिडिओ बनवण्याचे धारिष्ट्य जिहाद्यांमध्ये निर्माण झाले. त्यांच्यावर आताच वचक निर्माण केला नाही, तर ते आणखीन उद्दाम होऊन हिंदूंचा रक्तपात घडवून आणतील. कमलेश तिवारी यांनाही हत्येच्या धमक्या मिळाल्या होत्या, कन्हैयालाल यांनाही मिळाल्या होत्या; मात्र या धमक्यांची नोंद ना प्रशासनाने घेतली, ना पोलिसांनी, ना राजकारण्यांनी ! राजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार आहे. त्यामुळे तेथील सरकारकडून हिंदूंच्या हिताचे निर्णय घेण्याची अपेक्षा नाही; मात्र देशात भाजपशासित राज्यांतही हिंदूंची हीच स्थिती आहे. ही स्थिती कधी सुधारणार ? हिंदूंच्या मतपेटीचे मोल राजकारण्यांना कळले आहे, हे चांगलेच आहे; मात्र त्यांच्या जिवाचे मोल राजकारण्यांना कधी कळणार ? वर्ष १९७२ मध्ये इस्रायलच्या खेळाडूंचे हत्याकांड घडवून आणणाऱ्या जिहादी आतंकवाद्यांना वेचून ठार मारण्यासाठी इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेने राबवलेली मोहीम २० वर्षे चालली. या हत्याकांडात सहभागी असलेल्या शेवटच्या जिहाद्याला ठार मारेपर्यंत इस्रायलने सूडाग्नी धगधगत ठेवला. स्वतःच्या प्रत्येक नागरिकाचे मोल इस्रायल जाणून आहे. त्यामुळेच नागरिकाच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी तो टोकाची भूमिका घेऊ शकतो. कन्हैयालाल यांच्या हत्येचे धागेदोरे पाकपर्यंत पोचले आहेत. तसे पहाता हिंदूंवर जिहादची जी काळी सावली पडली आहे, त्यास पाक कारणीभूत आहे; मात्र त्याला अजूनही अद्दल का घडवली जात नाही ?

समतोलवाद बंद करा !

भारतात कट्टरतावाद्यांनी जाळपोळ किंवा हिंसाचार केल्यास त्यांना अटक केली जातेच; मात्र त्यासह हिंदूंनाही अटक करून ‘समतोल’ साधला जातो. ‘आम्ही ‘सर्वधर्मसमभावी’ आहोत. समाजातील एकाच घटकावर कारवाई करत नाही’, असे दाखवण्याचा प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून अश्लाघ्य प्रयत्न केला जातो. हिंदूबहुल भारतात हिंदूंवर धर्मांधांनी अन्याय केला आणि हिंदूंनी त्याला प्रतिकार केल्यास हिंदूंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, हे लज्जास्पद आहे. केंद्रात हिंदुत्वनिष्ठांचे सरकार येऊनही परिस्थिती पालटलेली नाही, हे खेदाने म्हणावे लागेल. अशा स्थितीत ‘हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व कुणाकडे आहे ?’, हा यक्ष प्रश्न आहे. हे दायित्व केंद्रातील सरकार उचलणार का ? उचलणार असेल, तर कधी उचलणार ? हिंदूंचे रक्षण करण्यापासून त्यांना कुणी अडवले आहे ? ‘आम्हाला कुणीच वाली नाही. आमचे रक्षण आम्हीच करायला हवे’, असे हिंदूंना वाटून त्यांनी कायदा हातात घेतला, तर त्याला उत्तरदायी कोण ? या प्रश्नांचे उत्तर शासनकर्त्यांनी गांभीर्याने शोधायला हवे !

हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व उचलायला कुणीही सिद्ध नसल्याने हिंदूंनी कायदा हातात घेतल्यास त्याला उत्तरदायी कोण ?