आरेमध्ये होणाऱ्या मेट्रोच्या कारशेडविरोधात आज पर्यावरणवाद्यांचे आंदोलन !

मुंबई – राज्य सरकारने मेट्रोची कारशेड पुन्हा आरेमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी ३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता आरे परिसरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड परिसरात पुष्कळ प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.