निधन वार्ता

पनवेल – येथील साधिका सौ. सुमेधा सुधीर जोशी यांच्या आई आणि सनातन संस्थेच्या हितचिंतक अन् अर्पणदात्या श्रीमती शैलजा देऊस्कर यांचे २९ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. जाहिरात देणे, प्रायोजकत्व देणे, गुरुपौर्णिमा अर्पण देणे या माध्यमातून त्यांचा संस्थेच्या कार्यात सहभाग होता. त्यांच्या पश्चात २ मुलगे, २ सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार जोशी आणि देऊस्कर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.