उदयपूर येथील हिंदु व्यक्तीच्या हत्येचे प्रकरण
जळगाव, २ जुलै (वार्ता.) – राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची धार्मिक द्वेषातून अमानुष हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन चोपडा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांच्या वतीने प्रशासनास देण्यात आले. निवेदन नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की,
१. हत्येचा व्हिडिओ करून हिंदु धर्मियांना धमकावण्यात आले आहे. तसेच ‘देशाच्या पंतप्रधानांचीही अशीच हत्या करू’, असे सांगत धर्मांध जिहादींनी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचे दुष्कृत्य केले आहे. या घटनेमागे मोठे देशविघातक षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे.
२. अशा प्रकारच्या घटना वारंवार राजस्थान राज्यामध्ये घडत असून तेथील हिंदु समाज स्वतःला असुरक्षित समजत असून त्यावर तेथील काँग्रेसशासित राज्य सरकार दुटप्पीपणे भूमिका घेत असल्याने हिंदु धर्मियांवर अन्याय होत आहे.
३. अशा प्रकारच्या धर्मांध शक्तींमुळे देशाची राज्यघटना धोक्यात येण्याची शक्यता आहे.
४. या धर्मांध जिहादींना आणि त्यामागे उभ्या असलेल्या देशविरोधी शक्तींना धडा शिकवण्यासाठी केंद्रीय स्तरावरून त्वरित योग्य ती नोंद घेऊन कठोर कारवाई करावी.
५. राजस्थानमधील हिंदुविरोधी राज्य सरकार बरखास्त करावे आणि संपूर्ण हिंदु समाजाला सुरक्षित करावे.
६. भारतात अशा हिंसक मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.