पुणे येथे २ लाखांची लाच घेतांना महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक कह्यात !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पिंपरी (जिल्हा पुणे) – रुग्णालयाचे ‘सोनोग्राफी सेंटर’ सील न करण्यासाठी नलिनी शिंदे या सिंधदुर्ग येथील ‘महिला अत्याचार निवारण कक्षा’च्या महिला साहाय्यक पोलीस निरीक्षकेने आधुनिक वैद्यांकडे ५ लाखांची लाच मागितली होती. यातील २ लाखांची रक्कम स्वीकारतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई निगडी येथील खासगी रुग्णालयात करण्यात आली. शिंदे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये नोंद असलेल्या गुन्ह्याच्या अन्वेषणासाठी निगडी येथे आल्या होत्या. या प्रकरणी ६२ वर्षीय महिला आधुनिक वैद्याने तक्रार दिली आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांची वाढती लाचखोरी चिंताजनक आहे. असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ? लाचखोरीवर जरब बसण्यासाठी एक सक्षम यंत्रणा प्रत्येक कार्यालयात उभारण्यासाठी आता सर्वसमावेशक प्रयत्न होणे आवश्यक !