विकासकामांच्या प्रक्रियेतील दोषांमुळे पुणे महापालिकेच्या ९ अभियंत्यांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचा दंड !
प्रशासकीय अधिकारी आणि अभियंते यांना कामाची पद्धत माहिती नाही कि ते जाणूनबुजून करतात, याचीही चौकशी व्हायला हवी ?
प्रशासकीय अधिकारी आणि अभियंते यांना कामाची पद्धत माहिती नाही कि ते जाणूनबुजून करतात, याचीही चौकशी व्हायला हवी ?
शहरातील महादेव मंदिर, जुनी लक्ष्मी चाळ येथे २२ मे ते २९ मे या कालावधीत सोलापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मृदंग तपस्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सेवानिवृत्तीनंतर शासकीय निवासस्थान सोडतांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक मनोज नरवडे यांना १ जून या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली.
इतक्या संख्येत अनधिकृत शाळा उभारल्या जाईपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता ? विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणाऱ्या संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !
राजकीय नेते आणि महापालिकेतील कर्मचारी यांच्या संगनमताने ही अवैध नळजोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याविषयी शंका उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून या दिवशी शहरात सभा आहे.
कुलगाम (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्याने विजय कुमार या बँक व्यवस्थापकांना बँकेत घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार मारले.
सरकारीकरण केलेल्या मंदिरातील भ्रष्टाचाराचे स्वरूप पहाता संबंधितांवर सरकारने तात्काळ कठोर कारवाई करणे आवश्यक !
महिला आहेत; म्हणून कुठेही सवलत न घेता उलट आदर्श कृती कशी असावी ? हे दाखवून देणाऱ्या कीर्ती जल्ली यांचा आदर्श अन्य प्रशासकीय अधिकारी घेतील का ?
महानगर किंवा नगरविकास यांच्या नावाखाली या मंदिरांना एकतर तोडले जाते किंवा तेथील मूळ निवासींना तेथून विस्थापित केले जाते. तेथील मूळ निवासी हे शहरी व्यवस्थेत राहून आपल्या परंपरेला विसरले आहेत. यामुळे ग्रामदेवतेची महानगरे आणि उपनगरे यांवर अवकृपा आहे.
धर्माने मनुष्याला योग्य आणि अयोग्य काय ? दोन्ही सांगितले आहे. मनुष्याने त्याचे पालन केले, तर त्याला लाभच होतो; परंतु एखाद्याने पालन केले नाही; म्हणून धर्म त्याला दंडित करत नाही. धर्माने मनुष्याला तसे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे विधवा धर्म पाळावा अथवा पाळू नये, याचा निर्णय एखाद्या ग्रामपंचायतीने किंवा सरकारने घेऊन काय उपयोग ?