उत्तरप्रदेशात आतापर्यंत ३२५ हून अधिक दंगलखोर मुसलमान गजाआड

नूपुर शर्मा प्रकरण

लक्ष्मणपुरी – नूपुर शर्मा यांच्या विरोधात गेल्या शुक्रवार, १० जूनला नमाजानंतर उत्तरप्रदेशमधील ९ जिल्ह्यांमध्ये दंगली करण्यात आल्या होत्या. यात दगडफेक आणि जाळपोळ करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर उत्तरप्रदेश पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास आरंभ केला असून आतापर्यंत ३२५ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राज्याचे पोलीस उपमहासंचालक यांनी सांगितले की, प्रयागराजमध्ये ९२, सहारनपूर ८०, हाथरस ५१, मुरादाबाद ३५, आंबेडकरनगर ४१, फिरोजाबाद १६, अलीगड ६, तर जालौनमध्ये ४ मुसलमान दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. यासंबंधी ९ जिल्ह्यांमध्ये एकूण १३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सहारनपूर जिल्ह्यात चिथावणीखोर भाषण करणार्‍या १८ लोकांनाही अटक करण्यात आली आहे. १३ घायाळ पोलीस कर्मचार्‍यांवर उपचार चालू आहेत. प्रयागराजमधील ३ जण हे अल्पवयीन दंगलखोर असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. (अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवणे, ही वरवरची उपाययोजना असून अशांना हिंसेसाठी प्रवृत्त करणार्‍या व्यवस्था आणि शिकवण यांना आळा घातला पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

शुक्रवारी झालेल्या नमाजानंतर किमान १४ राज्यांमध्ये मुसलमानांनी हैदोस घातला. तरी केवळ उत्तरप्रदेश शासनानेच दंगलखोरांच्या मुसक्या आवळल्या. अन्य राज्य सरकारे मात्र अपेक्षित कारवाई करतांना दिसत नाहीत. याविषयी गृहमंत्रालयाने त्यांना ठणकवायला हवे, असेच राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !