अलाहाबाद उच्च न्यायालयाने महंमद जुबैर यांच्यावरील गुन्हा रहित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महंमद जुबैर याच्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास नकार

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक महंमद जुबैर यांच्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास नकार दिला आहे. जुबैर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये महंत यति नरसिंहानंद सरस्वती, बजरंग मुनि आणि आनंद स्वरूप यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर जुबैर यांच्या विरोधात २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे) आणि ‘आयटी ऍक्ट’चे कलम ६७ च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावर जुबैर यांनी उच्च न्यायालयात गुन्हा रहित करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती.

जुबैर यांनी २७ मे या दिवशी तीनही संतांना ‘हेट मोंगर’ (द्वेष पसरवणारे) म्हटल्याने राष्ट्रीय हिंदु शेर सेनेचे सीतापूर जिल्हाध्यक्ष भगवान शरण यांनी खैराबादमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी जुबैर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.