नवी देहली – महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या नूपुर शर्मा यांना माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. गंभीर यांनी ट्वीट करत म्हटले की, क्षमा मागितल्यानंतरही एका महिलेविषयी देशभर द्वेषपूर्ण वक्तव्ये बोलली जात आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यावरून चालू असलल्या दंगली चिंताजनक आहेत. यासंदर्भात तथाकथित धर्मनिरपेक्ष उदारमतवादीलोकांचे मौन आश्चर्यकारक आहे.
Silence of so called ‘secular liberals’ on the sickening display of hatred & death threats throughout the country against a woman who has apologised is surely DEAFENING! #LetsTolerateIntolerance
— Gautam Gambhir (@GautamGambhir) June 12, 2022
भाजपच्या देहलीतील सफदरजंगच्या माजी नगरसेविका राधिका अब्रोल यांनीही त्यांच्या फेसबूक पानावर एक व्हिडिओ प्रसारित कूरन ‘नूपुर शर्मा या एक हिंदु महिला असून त्या काहीही चुकीचे बोलल्या नाहीत’, असे सांगत त्यांना पाठिंबा दर्शवला. यासह भाजपचे नेते राहुल त्रिवेदी यांनीही शर्मा यांना पाठिंबा दर्शवत ‘काही संघटना आणि त्यांचे लोक विदेशातून मिळालेल्या पैशांच्या जोरावर देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण त्यांचा हेतू कधीही यशस्वी होणार नाही. प्रत्येक राष्ट्रवादी व्यक्ती माझ्या बहिणीसमवेत (नुपूर शर्मा यांच्यासमवेत) आहे’, असे म्हटले आहे.