‘नन’वर बलात्कार केल्याचा आरोप असणार्‍या माजी बिशप फ्रँको मुलक्कल याला ‘पाद्री’ म्हणून पुन्हा काम करण्यास पोप यांची अनुमती

केरळमधील सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने अनुमती

बिशप फ्रँको मुलक्कल

व्हॅटिकन सिटी – केरळमधील एका ननवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी माजी बिशप फ्रँको मुलक्कल याला बिशप पदावरून, तसेच ‘पाद्री’पदावरून हटवण्यात आले होते. नुकतेच मुलक्कल याला या प्रकरणी केरळमधील कोट्टयम् येथील जिल्हा आणि सत्र  न्यायालयाने निर्दोष ठरवले. त्यानंतर ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु असणार्‍या पोप फ्रान्सिस यांच्याकडून मुलक्कल याला पुन्हा पाद्री म्हणून काम करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

सध्या मुलक्कल यांच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयात खटला चालू आहे.