
लंडन – प्रेषित महंमद यांच्या मुलीवरील चित्रपटाला विरोध करणार्या इमामाची ब्रिटनने सल्लागार पदावरून हकालपट्टी केली. या चित्रपटावर ईशनिंदेचा आरोप करत ब्रिटनमध्ये सहस्रावधी मुसलमान रस्त्यावर उतरले आहेत. लिड्समधील मक्का मशिदीचे प्रमुख इमाम कारी महंमद असीम यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध दर्शवला होता.

‘द लेडी ऑफ हेवन’ या चित्रपटावरून हा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटामध्ये प्रेषित महंमद यांची मुलगी फातिमा हिची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावणारा असल्याचे इमामने म्हटले होते. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता मलिक शिबाक यांना जीवे मारण्याच्या धमक्या सामाजिक माध्यमांद्वारे मिळत आहेत. यावर शिबाक यांनी ‘मला काफीर म्हटले जात आहे; मात्र याला घाबरण्यातला मी नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिकामुसलमान कितीही उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ असले, तरी त्यांच्यासाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यातून दिसून येते ! |
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !