भोंग्यांविषयीची पुढील भूमिका राज ठाकरे आज मांडणार

मुसलमान समाजाचा ईद हा सण आनंदाने साजरा व्हावा. आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे.

बांगलादेशात इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्याने धर्मांधांकडून हिंदु नेत्याला मारहाण

भारतात कधी दिवाळी, होळी आदी हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी न होणार्‍या अल्पसंख्यांकांच्या संदर्भात असे प्रकार घडतात का ? तरीही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !

भारतीय सैन्य आता भारतात निर्मित होणारी शस्त्रेच वापरणार !

भारत सरकारने तिन्ही सैन्यदलांना विदेशी बनावटीची शस्त्रे आणि इतर उपकरणे यांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय सैन्याला लागणार्‍या संरक्षण उपकरणांची निर्मिती करणार्‍या आस्थापनांना भारतातच उत्पादन करावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्‍याला प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्‍यास २ मे पासून प्रारंभ झाला. पंतप्रधान मोदी हे जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांच्या दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पोचले आहेत.

पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या नवर्‍याने ३ विवाह करावेत, असे तिला वाटत नाही.

लसीकरणासाठी बळजोरी केली जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

लसीकरणासाठी कुणावरही बळजोरी केली जाऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोरोना लस घेणे अनिवार्य करण्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

उत्तराखंड सरकार विद्यार्थ्यांना वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता शिकवणार !

बहुसंख्य हिंदूंच्या देशातील प्रत्येक राज्यातील शालेय अभ्यासक्रमांत हिंदु धर्मग्रंथ शिकवले पाहिजेत !

हिंसेवरून राजकारण करणार्‍यांना उघडे पाडा !

देशभरात हिंसेवरून राजकारण करणार्‍यांना उघडे पाडले पाहिजे, अशी मागणी देशातील ८ माजी न्यायाधीश, ९७ निवृत्त अधिकारी आणि सुरक्षादलांतील ९२ माजी अधिकारी यांच्यासह एकूण १९७ मान्यवरांनी पंतप्रधान मोदी यांनी खुले पत्र लिहून केली.

… अन्यथा ४ मेपासून हनुमान चालिसा दुप्पट आवाजाने लावणारच !

महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत, तशी माझी इच्छाही नाही; पण ३ मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली जाईलच.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट

‘‘या भेटीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खाण, पर्यटन, मोपा विमानतळ आणि महामार्गाचे बांधकाम या विषयांवर चर्चा केली. गोवा राज्य देशाची पर्यटन राजधानी बनवण्यासाठी केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता आहे. खाणी चालू करण्यास अनुमती मिळाल्यानंतर लवकरच खाणींची निविदा काढण्यात येणार आहे.’’